केंद्र सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.द न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेडमध्ये भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.ही भरती अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (Generalists & Specialists/ Scale – I) पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे.
यासाठी तुम्ही newindia.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
आवश्यक पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही विषयात किंवा स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत सीए, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटमध्ये ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी. एमबीए/पीजीडीएम / फायनान्स / एमकॉम पदवी प्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ९०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर अनेक फायदेदेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. प्रिलियम्स, मेन्स परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर तुमची मुलाखत होईल. मुलाखतीत पास झाल्यानंतर तुमची निवड केली जाणार आहे.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ibpsonline.ibps.in/niacljul25/ या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करुन रजिस्टर करावे.
यानंतर सर्व माहिती भरा. फोटो आणि सही अपलोड करा.
यानंतर निर्धारित शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा. अर्ज केल्यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
NIACL Recruitment















Discussion about this post