न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड म्हणजे एनआयएसीएलमध्ये (NIACL) भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ही भरती अप्रेंटिसशिपसाठी होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ५०० रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तुम्ही एनआयएसीएलच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://newindia.co.in यावर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२५ आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
NIACL मधील या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गासीठी २६० जागा आहेत. ईडब्ल्यूएससाठी ३९ पदे, ओबीसीसाठी ११० तर एससीसाठी ६१ पदे राखीव आहेत. या अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करणारा नागरिक भारतीय असणे गरजेचे आहे. त्य उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून १ एप्रिल २०२१ पूर्वी पदवी प्राप्त केलेली असावी. २१ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ९४४ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल टेस्टद्वारे होणार आहे. या अप्रेंटिसशिपसाठी तुम्हाला ९००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. ज्यांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.
Discussion about this post