सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये ५०० जागांसाठी भरतीची जाहिरात निघाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.या नोकरीसाठी ibpsonline.ibps.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०२५ आहे.
एनआयएसीएलमध्ये असिस्टंट पदासाठी भरती जाहीर केली आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी भरती उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली येथे होणार आहे.न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील या नोकरीसाठी उमेदवारांने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. (
या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. असिस्टंट पदासाठी लेखी परिक्षाद्वारे भरती केली जाणार आहे. ही परीक्षा २७ जानेवारी रोजी होणार आहे. टियर २ साठी परीक्षा २ मार्च २०२५ रोजी होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांनी ८५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहेत. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी १०० रुपये फी भरावी लागणार आहे.















Discussion about this post