नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींसाठी खुशखबर आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिकमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा दिलेल्या तारखेत करावा लागणार आहे.
या भरतीद्वारे एकूण 51 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक 04 एप्रिल 2025 आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.
कोणती पदे भरली जाणार?
वैद्यकीय अधिकाऱ्याच्या 19 जागा तर बहुउद्देशीय कामगार (एमपीडब्ल्यू पुरुष) पदाच्या 32 जागा ह्या भरल्या जाणार आहेत.
पात्रता काय असणार?
वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS preference/ BAMS ही पात्रता हवी.
तर बहुउद्देशीय कामगार (एमपीडब्ल्यू पुरुष) पदासाठी विज्ञान शाखेत 12 वी उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अशी पात्रता हवी.
वयोमर्यादा अट अशी
04 एप्रिल 2025 रोजी, 18 – 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
परीक्षेला लागणारी फी पुढील प्रमाणे असणार
: खुला प्रवर्ग: 150/- रुपये. [मागासवर्गीय: 100/- रुपये.]
वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
अर्ज कुठे करावा यासाठी पत्ता पुढील प्रमाणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.
Discussion about this post