भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. भरघोष पगाराची नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी एनएचएआयमधील nhai.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी ५ मार्च २०२५ ही शेवटची तारीख आहे.याबाबत अधिक माहितीसाठी वेबसाइटवर भेट द्या. ()
ही पदे भरली जाणार?
या भरती मोहिमेत प्रिंसिपल कंसल्टंट, कंसल्टंट (RAMS),कंसल्टंट (RAMS-IT) पदांसाठी ही भरती होईल. प्रिंसिपल कंसल्टंट (RAMS) साठी वयोमर्यादा ५५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. कंसल्टंट पदासाठी ५० वर्षे वयोमर्यादा आहे. कंसल्टंट (RAMS-IT)साठी 50 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
प्रिंसिपल कंसल्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिविल इंजिनियरिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीमध्ये ग्रॅज्युएशन केलेले असावे.प्रिंसिपल कंसल्टंट पदासाठी २,३०,००० रुपये पगार मिळणार आहे. कंसल्टंट पदासाठी १,५०,००० रुपये पगार मिळणार आहे. तर कंसल्टेंट (RAMS-IT)पदासाठी १,५०,००० रुपये पगार मिळणार आहे.
Discussion about this post