सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये भरती सुरु आहे. डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जात असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. विशेष कोणत्याही परीक्षेशिवाय तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे.
या भरतीद्वारे एकूण ६० जागा रिक्त आहेत यात २७ पदे सामान्य प्रवर्गासाठी तर इतर पदे राखीव प्रवर्गासाठी आहेत. या नोकरीसाठी तुम्ही वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तुम्हाला वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्जावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करुन फॉर्म जमा करायचा आहे. या फॉर्मचे प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
शैक्षणिक पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिविल इंजिनियरिंगमध्ये बीई किंवा बीटेक डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत GATE २०२५ मध्ये चांगले गुण असणे गरजेचे आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड फक्त GATE २०२५ मध्ये मिळालेल्या स्कोअरच्या आधारे होणार आहे. या नोकरीसाठी ना कोणती परीक्षा ना कोणता इंटरव्ह्यू होणार नाही.
या नोकरीसाठी अर्जपप्रक्रिया १० मे पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जून २०२५ आहे. इच्छुकांनी vacancy.nhai.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. सर्व कागदपत्रेदेखील अपलोड करा.
Discussion about this post