भारतातील बहुतेक तरुणांचे स्वप्न असते की त्यांना सरकारी नोकरी मिळेल. जर तुम्हीही अशाच उमेदवारांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच (NHAI)मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पदवीधारकांसाठी
एनएचएआयमध्ये डेप्युटी मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स), ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO)सह अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तुम्हाला nhai.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.
एनएचएआयमध्ये ८४ पदांसाठी भरती केली जाणार आहे. डेप्युटी मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स), ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO), लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट, अकाउंटंट आणि स्टेनोग्राफर ग्रेड II पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.
पात्रता
डेप्युटी मॅनेजर पदसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए केलेले असावे. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट पदासाठी लायब्ररी सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलेले असावे. अकाउंटंट पदासाठी ग्रॅज्युएशनसोबत चार्टर्ड अकाउंटंट पदवी प्राप्त केलेली असावी.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी nhai.gov.in वेबसाइटवर जा.
यानंतर होमपेजवर दिलेल्या ABOUT NHAI वर क्लिक करा. यानंतर Vacancy सेक्शवर जा.
यानंतर Sr. No:1, 30-10-2025 वर क्लिक करा.
रजिस्ट्रेशन करा त्यानंतर फॉर्म भरा. कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर फॉर्म नीट चेक करुन सबमिट करा.















Discussion about this post