जळगाव । राज्यात मान्सूनचे आगमन लांबलं असलं तरी वळिवाचा पाऊस सध्या अनेक भागात जोरदार होत आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, अशातच भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून राज्यातील काही जिल्ह्यांना महत्वाचा इशारा दिला आहे.
जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी पुढील 3 ते 4 तासात विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यादरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहतील, असाही इशारा देण्यात आला आहे.
त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.