बीड । भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढवणारी एक बातमी आहे. जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे याच्या कारखान्याला नोटीस बजावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.
पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने सहा महिन्यांपूर्वी धाड टाकली होती. यावेळी जीएसटी विभागाने काही कागदपत्रे जप्त केली होती.
हे कागदपत्र तपासले होते. यावेळी या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी नगर येथील जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या या कारखान्याला नोटीस बजावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
19 कोटी रुपयांचा कर बुडवला
याआधीही केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजी नगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत नोटीसा दिल्या होत्या. या नोटिसींना उत्तर न दिल्याने सहा महिन्यांपूर्वी काही अधिकार्यांनी या कारखान्याला अचानक भेट देऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतले होते. त्यामध्ये या कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाल्याने शनिवारी कारखान्याला यासंदर्भात पुन्हा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता कारखान्याकडून त्यावर काय उत्तर दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, या आधीच युनियन बँकेने कारखान्याची मालमत्ता सील केली आहे. युनियन बँकेचे कारखान्यावर 1200 कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज न फेडल्याने बँकेने ही कारवाई केली आहे. बँकेची ही कारवाई ताजी असतानाच आता जीएसटी कार्यालय अधिक सक्रिय झाल्याने कारखान्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
Discussion about this post