मुंबई । २०२६ या नवीन वर्षाच्या सुरुवातीसह, सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलले आहेत. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या खिशावर होणार आहे. या बदलांमध्ये एलपीजी गॅसच्या किमतींपासून ते कारच्या किमती, बँकिंग नियम, यूपीआय, आणि सरकारी योजनांचा समावेश आहे. नवीन वर्ष नवीन आशा घेऊन येत असताना, काही निर्णयांमुळे खर्चही वाढला आहे.
1.आधार पॅन कार्ड लिंकची डेडलाइन
आधार आणि पॅन कार्ड लिंक करायची डेडलाइन संपली आहे. आता तुम्हाला यापुढे आधार पॅन कार्ड लिंक करता येणार नाही. यामुळे ज्यांनी अजून हे काम केले नाही त्यांचे पॅन कार्ड बंद होणार आहे.
2. नवीन आयटीआर फॉर्म
२०२६ पासून नवीन इन्कम टॅक्स फॉर्म लागू होणार आहेत. याची प्रोसेस आजपासून सुरु झाली आहे. यामध्ये तुम्हाला बँक ट्रान्झॅक्शन आणि खर्चाची माहिती द्यावी लागणार आहे.
3. नवीन टॅक्स कायदा
नवीन वर्षात नवीन टॅक्स कायदा लागू केला जाणार आहे. सरकार जुना इन्कम टॅक्स अॅक्ट १९६१ काढून नवीन कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे.१ एप्रिलपासून नवीन अॅक्ट लागू होणार आहे.
4. आठवा वेतन आयोग
आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. या नवीन वेतन आयोगाचा ५० लाख कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
5. पीएम किसानच्या नियमात बदल
पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. जर फार्मर आयडी नसेल तर योजनेचा हप्ता मिळणार नाही. आता काही राज्यातच हा नियम आहे. भविष्यात संपूर्ण देशात हा नियम लागू केला जाईल.
6. क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्याला अपडेट होणार
आजा क्रेडिट कार्डच्याही नियमात बदल झाले आहे. क्रेडिट स्कोअर दर महिन्याला अपडेट होणार आहे.
7. बँक आणि एफडीच्या दरात बदल
नवीन वर्षात बँकेच्या व्याजदरात आणि एफडीमध्ये बदल होणार आहे. यातील व्याजदर बदलणार आहेत. यामुळे ग्राहकांवर परिणाम होणार आहे.
8. एलपीजी गॅस
दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होतात. आजदेखील हे बदल झाले आहेत. व्यावसायिक गॅसच्या किंमती १११ रुपयांनी वाढल्या आहेत.
9. व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसाठी नियम
आता व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम अॅपसाठी नियम लागू केले आहे. आता या अॅपसाठी फोन नंबर अनिवार्य केला आहे. फोन नंबर ९० दिवसांपर्यंत अॅक्टिव्ह असणे अनिवार्य आहे.
10. पेट्रोल, डिझेलचे दर
आजपासून एव्हिशन फ्यूएलचे दरदेखील बदलले आहेत. हे दर कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. जर कच्च्या तेलाचे दर घसरले तर इंधनाचे दरदेखील बदलतात.
११. कार महागल्या
नवीन वर्षासह, कार खरेदी करणे देखील महाग झाले आहे. १ जानेवारी २०२६ पासून, अनेक ऑटो कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. बीएमडब्ल्यू, रेनॉल्ट आणि निसान यांनी ₹३,००० ते ३% पर्यंत किमती वाढ जाहीर केली आहे.















Discussion about this post