राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर असून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून महाभरती घेण्यात येत आहे. अराजपत्रित गट ब व गट ड संवर्गातील विविध पदांच्या जागा रिक्त असून यामध्ये क्रीडा अधिकारी ते शिपाई पदापर्यंत १११ पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट ही आहे.
एकुण पदसंख्या – १११
या पदांसाठी होणार भरती
क्रिडा अधिकारी – ५९
क्रिडा मार्गदर्शक – ५०
कनिष्ठ श्रेणी लघुलेखक – ०१
शिपाई – ०१
पात्रता :
क्रिडा अधिकारी आणि क्रिडा मार्गदर्शक:
या पदांसाठी अर्जदार उमेदवार हा सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य किंवा विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ श्रेणी लघुलेखक:
या पदाकरीता उमेदवार हा इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही, इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
Fee : सदर पदभरती साठी जनरल उमेदवारांकरीता १०००/- रुपये तर मागास वर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग उमेदवारांकरीता ९००/- आवेदन शुल्क आकारण्यात आले आहे.
शिपाई:
या पदाकरीता उमेदवार हे इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
Notification
असा भराल अर्ज :
अर्जदार उमेदवारांना विहीत कालावधीमध्ये म्हणजे १० ऑगस्टच्या आधी ऑनलाईन पद्धतीने https://sports.maharashtra.gov.in/sports_web/ या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहेत .
Discussion about this post