तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. विशेष म्हणजे कोणत्याही परीक्षेशिवाय उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे.
भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्था यांच्याकडून राबवली जात असून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे.
तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
या भरती प्रक्रिया यामध्ये विजिटिंग फॅकल्टी पदाचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 3 जानेवारी 2024 ला मुलाखतीसाठी उपस्थित राहवे लागणार आहे.
उमेदवारांना 3 जानेवारी 2024 ला मुलाखतीसाठी हजर राहवे लागणार आहे. तसेच मुलाखतीसाठी येताना महत्वाची कागदपत्रे देखील सोबत आणावी लागणार आहे. जाहिरातीमध्ये जी काही कागदपत्रे मागवण्यात आली ती सर्व कागपत्रे घेऊन उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहवे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी परीक्षेचे नो टेन्शन असणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्था, शिवाजी नगर, पुणे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहवे लागेल. मुलाखतीसाठी उमेदवारांना वर दिलेल्या पत्त्यावर सकाळी 10.30 ला उपस्थित राहणे आवश्यक आहे. उशीरा आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाणार नाहीये.
उमेदवारांनी मुलाखतीला येताना जाहिरात ही व्यवस्थित वाचून घ्यावी. मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. इतर माहितीसाठी आपण महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्था यांच्या वेब साईटला देखील भेट देऊ शकता. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळणार आहे.















Discussion about this post