Wednesday, April 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

आज १ एप्रिलपासून नवीन करप्रणाली लागू ; तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 1, 2026
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
आज १ एप्रिलपासून नवीन करप्रणाली लागू ; तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या
बातमी शेअर करा..!

केंद्र सरकारने आयकर प्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने १ एप्रिल २०२६ पासून नवीन आयकर नियम लागू केले आहेत. तब्बल ६५ वर्षे जुने आयकर नियम रद्द करत आता ‘टॅक्स इयर’ (कर वर्ष) ही नवी संकल्पना लागू करण्यात आली आहे. या बदलामुळे आर्थिक वर्ष आणि निर्धारण वर्ष यातील गोंधळ संपणार असून करदात्यांसाठी प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

नवीन नियमानुसार, १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ हा कालावधी ‘कर वर्ष २०२६-२७’ म्हणून ओळखला जाणार आहे. आयकर आणि पगाराशी संबंधित अनेक नियमांमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

फॉर्म १६ बंद; आता फॉर्म १३० लागू
१ एप्रिलपासून पारंपरिक फॉर्म १६ बंद करण्यात आला असून त्याऐवजी फॉर्म १३० लागू करण्यात आला आहे. या नव्या फॉर्ममध्ये पगार, टीडीएस, कर गणना आणि कपातीचा संपूर्ण तपशील एकाच ठिकाणी मिळणार असल्याने आयटीआर भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

आयटीआर भरण्याच्या तारखांमध्ये बदल
नवीन नियमांनुसार, ITR-3 आणि ITR-4 दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे. तसेच दंडासह सुधारित रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे.

परदेश प्रवास आणि शिक्षणासाठी TCS दर कमी
सरकारने उदारीकृत रेमिटन्स योजनेअंतर्गत (LRS) परदेशात शिक्षणासाठी पाठवलेल्या रकमेवरील आणि परदेश प्रवासावरील TCS दर ५ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. यामुळे परदेशी शिक्षण आणि प्रवास करणाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

HRA आणि सवलतींमध्ये मोठे बदल
घरभाडे भत्त्यासाठी (HRA) आता अधिक कडक नियम लागू करण्यात आले असून, नवीन फॉर्म १२४ मध्ये घरमालकाचे नाव, पत्ता आणि पॅन क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच बंगळूर, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद या शहरांचा ५० टक्के HRA सवलत असलेल्या शहरांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

वैद्यकीय आणि मील व्हाउचर्स सवलतीत वाढ
कंपनीकडून मिळणाऱ्या वैद्यकीय उपचारांवरील कर सवलतीची मर्यादा २० हजार रुपयांवरून २ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ऑफिस मील व्हाउचर्सवरील कर सवलत ५० रुपयांवरून २०० रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.

अपघात भरपाई आणि सहकारी संस्थांना दिलासा
नवीन नियमांनुसार, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाकडून मिळणारी नुकसान भरपाई पूर्णपणे करमुक्त करण्यात आली आहे. तसेच सहकारी संस्थांमधील गुंतवणुकीवरील लाभांशाला तीन वर्षांसाठी करसवलत देण्यात आली आहे.

एकूणच, नव्या आयकर नियमांमुळे करप्रणाली अधिक सुलभ आणि डिजिटल होणार असून करदात्यांना अनेक बाबतीत दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मार्च एंडला मंत्रालयात जीआरचा विक्रम; चार दिवसांत तब्बल ९५१ शासन निर्णय जारी

Next Post

भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सरकारी वकिलांचा केस चालवण्यास नकार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सरकारी वकिलांचा केस चालवण्यास नकार

भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सरकारी वकिलांचा केस चालवण्यास नकार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सर्वसामान्यांना हक्काचे घर देणारी रमाई आवास योजना ; कोण आहे पात्र? आणि कुठे अर्ज करावा?

रेडी रेकनर दरात वाढ नाही; नव्या आर्थिक वर्षात घरखरेदीदारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

April 1, 2026
भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सरकारी वकिलांचा केस चालवण्यास नकार

भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सरकारी वकिलांचा केस चालवण्यास नकार

April 1, 2026
आज १ एप्रिलपासून नवीन करप्रणाली लागू ; तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या

आज १ एप्रिलपासून नवीन करप्रणाली लागू ; तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या

April 1, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

मार्च एंडला मंत्रालयात जीआरचा विक्रम; चार दिवसांत तब्बल ९५१ शासन निर्णय जारी

April 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page