नवी दिल्ली । राजधानी दिल्लीत रेल्वे अपघात झाला असून ट्रेनचे ८ डबे रुळावरून घसरल्यामुळे ट्रेन उलटली. जाखिरा उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी बचावकार्य सुरू केलं आहे.
डीसीपी रेल्वे केपीएस मल्होत्रा यांनी सांगितलं की, रूळावर कोणतीही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बचावकार्य सुरू आहे. परंतु अजून जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दल आणि रेल्वेने मदतकार्य सुरू केलं
ही मालगाडी सकाळी 11.55 च्या सुमारास झाखिरा उड्डाणपुलाजवळ रुळावरून घसरली. त्यामुळे ती पलटी उलटली झाली (Train Derail) आहे. अपघातस्थळावरील एका व्हिडिओमध्ये रेल्वे रुळावरून खाली घसरलेल्या बोगी दिसत आहेत. मालगाडी लोखंडी पत्र्याचे रोल घेऊन मुंबईहून चंदीगडला जात होती, अशी माहिती मिळतेय.















Discussion about this post