जळगाव । रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगाव आणि भुसावळ मार्गे पनवेल ते अलीपूरद्वार दरम्यान नवीन अमृत भारत एक्स्प्रेस २३ फेब्रुवारीपासून नियमितपणे धावणार आहे. या गाडीला तब्बल ११ जनरल (सामान्य द्वितीय श्रेणी) डबे जोडले जाणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना गर्दीच्या हंगामात मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
यापूर्वी पनवेल ते अलीपूरद्वार अमृत भारत ही आठवड्यातून एक दिवस धावत होती. मात्र या गाडीची सेवा २३ तारखेपासून नियमितपणे सुरू होत आहे. गाडी क्रमांक ११०३१ पनवेल–अलीपूरद्वार अमृत भारत एक्स्प्रेस २३ फेब्रुवारीपासून दर सोमवारी पनवेल रेल्वे स्थानकावरुन सकाळी ११.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी ०१.५० वाजता अलीपूरद्वार जंक्शन स्थानकावर पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ११०३२ ही २६ फेब्रुवारीपासून दर गुरुवारी पहाटे ४.४५ वाजता अलीपूरद्वार येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
कोण कोणत्या स्थानकांवर थांबेल?
ही साप्ताहिक एक्स्प्रेस दोन्ही बाजुने कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, बरगढ, प्रयागराज छिवकी, मेजा रोड, मिर्झापूर, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, हसनपूर रोड, खगडिया, मानसी, नौगछिया, कटिहार, बरसोई, किशनगंज, अलुआबारी रोड, न्यू जलपाईगुडी, सिलीगुडी, बिन्नागुडी आणि हासीमारा या स्थानकांवर थांबेल.















Discussion about this post