मुंबई । ‘राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेनं (शिंदे गट) वर्तमान पत्रांमध्ये छापून आल्यांनतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले.यावरुन भाजपच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सारवासारव करण्यात येत आहे. मात्र त्यानंतर आता भाजप-शिवसेना युतीची नवी जाहिरात समोर आली आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे.
याशिवास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो जाहिरातीत झळकला आहे. जनतेचा कौल शिवसेना-भाजप युतीलाच असा दावा सुद्धा जाहिरातून करण्यात आला आहे. तर ४९.३० टक्के जनतेचा शिंदे-भाजप सरकारला आर्शिर्वाद आहे, असंही या जाहिरातीत म्हटलं आहे. त्यामुळे आता जाहिरातीचा हा वाद इथेच थांबणार की आणखी लांबणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शिंदेंच्या जाहिरातमध्ये नेमकं काय होतं?
राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे, अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे… पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.
मतदान सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच, महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार… असं शिंदे यांच्या जाहिरातीत म्हटलं होतं.
Discussion about this post