नेपाळमधील हुकूमशाही कारभार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि त्यात सोशल मीडियावरील बंदीनं तेल ओतल्यानं जनरेशन झेडच्या (Gen-Z) च्या संतापाचा आगडोंब उसळला. ‘जेन झी’च्या आंदोलनामुळे नेपाळ पेटलं असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. आंदोलनाने उग्र रूप धारण करत रस्त्यांवर दगडफेक आणि जाळपोळ केली आहे.
जेन-झी आंदोलनाच्या आगीत २४ तासांच्या आत ओली सरकारचे सत्तेचे सिंहासन भस्मसात आले. पोलिसांच्या गोळीबारात २४ तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात हिंसाचार उसळला. दबाव इतका वाढला की अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनाही राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी तात्काळ राजीनामा स्वीकारला. यानंतर ओली हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी पळून गेले. राजीनामा देऊनही संताप थांबला नाही. जमावाने राष्ट्रपतींचे निवासस्थान, संसद, सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधानांचे निवासस्थान आणि मंत्र्यांची घरे जाळली. ओली यांचे खासगी घरही जाळले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आंदोलकांनी माजी पंतप्रधान झलनाथ खनल यांच्या घरालाही आग लावली. त्यात त्यांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. देशभरात कडक कर्फ्यू आणि अनेक निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र, त्याचा परिणाम आंदोलनावर झाला नाही. सुरू असलेल्या आंदोलनात किमान 19 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 200 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. .















Discussion about this post