भारताचा शेजारी देश नेपाळमधून मोठी बातमी येत आहे. नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेकऑफनंतर विमान कोसळले. या अपघातानंतर विमानातून धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते. या विमानात 19 प्रवासी होते त्यापैकी किमान 13 जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
या विमानाने पेट घेतल्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भाती व्यक्त होत आहे. हे विमान काठमांडू वरुन पोखरा येते जात होते. या टेकऑफ दरम्यान हे विमान धावपट्टीवर कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.
दु:खद् खबर । एयरपोर्ट पछाडी सिनामंगलमा विमान दुर्घटना ।
video : Samip Shrestha pic.twitter.com/9Cx6NBEb0j— Bijay Timalsina (@bjtimalsina) July 24, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण केल्यानंतर लगेचच एका विमानाला अपघात झाला. हे विमान शौर्य एअरलाईन्सचे असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोखरा जाणाऱ्या या विमानात एकूण १९ जण होते. यामध्ये क्रू मेंबर्सचाही सहभाग होता.
विमानाचा टायर अचानक फुटल्याने विमान धावपट्टीवर जोराने आदळल्यानंतर त्याला मोठी आग लागली, परंतु आपत्कालीन यंत्रणेने ही आग त्वरित विझवली. पायलटला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. या दुर्घटनेत 13 जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.















Discussion about this post