नवी दिल्ली । नीट यूजी पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने याप्रकरणात आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की पेपरचं कोणतेही ’सिस्टीमॅटिक ब्रीच’ झाले नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आणि अनेक वादांवर पडदा टाकला. आता ही परीक्षा पुन्हा होणार नाही, तर परीक्षेत देशात सगळीकडेच गोंधळ उडाला, पेपर लीक झाला हा आरोप न्यायालयात टिकला नाही, हे स्पष्ट झाले.
पेपर लीक फक्त पाटणा आणि हजारीबाग पुरतां मर्यादित होता. एनटीए ने यापुढे काळजी घ्यायला पाहिजे, अशी ताकीद पण न्यायालयाने दिली. आम्ही नीटच्या पुर्नपरिक्षेच्या मागणीला फेटाळत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
संपूर्ण परिक्षा पद्धतीत कोणताही बिघाड नसल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितले. कोर्टाने कमिटीचा अहवाल तयार करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२४ चा कालावधी निश्चीत केला आहे.सरन्यायाधीशांनी याप्रकरणात केंद्र सरकारने एक समिती गठीत केल्याचे स्पष्ट केले. या समितीत एक मूल्यांकन समिती पण असेल. परीक्षा प्रणालीतील सायबर सुरक्षेतील कमकुवत पणा शोधण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करण्याची गरज असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.















Discussion about this post