मुंबई : उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
डॉ. गोऱ्हेंचा शिंदे गटात प्रवेश पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं आहे. ठाकरे गटातील प्रमुख नेत्या म्हणूनही नीलम गोऱ्हे यांच्याकडे पाहिलं जात होतं. भाजपसोबतची युती तुटल्यानंतर ठाकरेंची बाजू त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. त्यांचा ठाकरे गटाला रामराम म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा धक्का आहे.
ठाकरे गटाला रामराम ठोकून नीलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विधानभवनात शिवसेना पक्षकार्यालयात नीलम गोऱ्हेंनी पक्षप्रवेश केला आहे. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उदय सामंत उपस्थित होते.
Discussion about this post