जळगाव । अहमदनगर जिल्ह्यातुन एक धक्कादायक घटना घडली असून बुडालेल्या मुलांच्या शोधासाठी गेलेल्या एसडीआरएफ पथकाची बोट प्रवरा नदीत बुडाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी घडली. यात जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील राज्य आपत्ती दलातील पोलीस शिपाई वैभव वाघ यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला. या मुलांच्या शोधासाठी धुळ्यातील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे काल २२ मे रोजी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीपत्रात शोध मोहीम राबवित असताना त्यांची बोट बुडाली.
या बोटमध्ये पथकातील चार जण आणि स्थानिक असे पाच जण प्रवरा नदी पात्रात बुडाले. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असून अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे. धुळे एसडीआरएफ बलगट क्रमांक 6 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलिस शिपाई वैभव वाघ व पोलीस शिपाई राहुल पावरा या तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार कॉन्स्टेबल या दोघांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे) आणि अर्जुन रामदास जेडगूले यांचा शोध अद्याप सुरु आहे.
Discussion about this post