नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तुम्ही ncrtc.in या वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या नोकरीसाठी २४ एप्रिल २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
एनसीआरटीसीमध्ये ७२ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्युनिअर इंजिनियर इलेक्ट्रिकल पदासाठी १६ जागा रिक्त आहे. ज्युनिअर इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स पदासाठी १६ जागा रिक्त आहेत. ज्युनिअर इंजिनियर मेकॅनिकल, ज्युनिअर इंजिनियर सिविल प्रोग्राम असोसिएट, असिस्टंट एचआर, असिस्टंट कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी, ज्युनिअर मेंटेनर इलेक्ट्रिकल पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ३ वर्षांचा डिप्लोमा/आयटी/ बीसीए / बीएससी कॉम्प्युटर सायन्स/ बीबीए / बॅचरल डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम तुम्हाला ncrtc.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर होमपेजवर करिअर सेक्शनवर जायचे आहे.
यानंतर नवीन रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे आहे. यानंतर सर्व माहिती भरा.
यानंतर शुल्क भरुन तुम्ही अर्ज दाखल करा. याची प्रिंटआउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
इंजिनियरिंचे शिक्षण पूर्ण केले असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. तुम्ही करिअरची सुरुवात करण्यासाठी ही नोकरी(Job) करु शकतात. या नोकरीतून तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Discussion about this post