मुंबई । राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकाणावरून विरोधकांकडून अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला जात आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलेय.
राष्ट्रवादीची औलद सत्तेशिवाय राहू शकत नाही, असे वक्तव्य सावंत यांनी केलेय. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याने राजकीय वादाचा नवा अंक सुरू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
धाराशिवमध्ये बोलताना माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी पक्षाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेय. ही राष्ट्रवादीची औलाद अशी आहे ती सत्ते शिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडपडतो तसं राष्ट्रवादीला होतं, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये केलेय. या दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत मी सांगत होतो, याचा प्रत्यय तुम्हाला गेल्या महिन्याभरात आला असेल, असेही सावंत म्हणाले.
दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, हे मी सांगितले होते. असं सांगणारा महाराष्ट्रातील मी एकमेव आमदार आहे, असे तानाजी सावंत महणाले. तुम्हाला युतीची तत्त्वे जर माहीत नसतील तर तुम्ही कशासाठी युती करत आहेत, असेही वक्तव्य आमदार तानाजी सावंत यांनी भूम येथे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत केले आहे. त्याचबरोबर गरज नसताना तुम्ही त्याला का घेतलं असं म्हणत माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेशाबद्दल संतापले.















Discussion about this post