मुंबई : निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा असल्याचा निकाल दिलाय शिवाय शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गटातील आमदार पात्रच आहेत असाही निकाल दिला. मात्र या राहुल नार्वेकर यांच्या या निकालावर ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उज्ज्वल निकम?
हा निकालाच्या सर्व निर्णय निवडणूक आयोगाच्या आधारे देण्यात आले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडून एक मोठी चूक झालेली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाच्या उद्दिष्टाबाबत कोणीही पुरावा दिला नाही, असे म्हटले. त्यामुळे पक्षाच्या उद्दिष्टांचा भंग झालाय असे आम्ही मानत नाही. पण राष्ट्रवादीच्या घटनेबाबत आयोग म्हणतो की, दोन्ही गटांनी त्याचा भंग केलाय. त्यामुळे हे सर्व चमत्कारिक आहे.
पक्षाच्या घटनेनुसार पक्ष संघटनेत कोणाचे प्राबल्य आहे? हा महत्वाचा आणि कळीचा मुद्दा असतो. दुसरा मुद्दा निडवणूक चिन्हावर कोणाची मेजॉरीटी निवडून आली. लोकशाहीमध्ये पक्षीय बलाबल एवढाच मुद्दा ठरत नाही. त्यावरती पक्षाची घटनाही महत्वाची असते. पक्षातील पदाधिकारी लोकशाही पद्धतीने निवडून आले आहेत का? हे निवडणूक आयोगाने पाहाणे क्रमप्राप्त होते. ते पाहण्यात आलेले नाही. परंतू हा आज निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. याला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती नाही. त्यामुळे अध्यक्षांचे काम सोपे झाले.
Discussion about this post