मुंबई । विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडलीआहे. मात्र सुनावणीच्या पहिल्याच दिवस मोठा ट्विस्ट निर्माण झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांची उलटसाक्ष नोंदवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी शरद पवार गटाच्या वकिलांनीदेखील जितेंद्र आव्हाड यांना काही प्रश्न विचारले. यावेळी काही प्रश्नांवर दोन्ही गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. पण सुनावणीच्या पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी झाल्या होत्या, असं उत्तर दिलं. पण त्याची कागदपत्रे आणि पुरावे एका बंद कपटात ठेवण्यात आले होते. ते गायब झाल्याचं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.
“पक्षांतर्गत निवडणूक झाली होती. मात्र confidential कपाटात हे कागदपत्र ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले. संबंधित माणसं पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी या कागदपत्रांचे म्हणजे पुराव्यांचा काय केलं माहिती नाही”, असं मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी आजच्या सुनावणीत केला. त्यामुळे आता ही सुनावणी कोणत्या स्तरावर जाते ते पाहणं जास्त महत्त्वाचं आणि रंजक होणार आहे.
Discussion about this post