जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. एकनाथ खडसे यांच्या उपचारासाठी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे.
खडसे यांना उपचारासाठी जळगावहून मुंबईला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. खडसे यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समजताच त्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी एकनाथ खडसे यांच्या छातीमध्ये अचानक दुखत होते. यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती मिळत आहे.
Discussion about this post