मुंबई : आज राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या. अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत ३५ ते ३६ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.
अजित पवारांनी बंड केल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या नेत्यांकडे काही जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अनिल पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोदपद होते. अनिल पाटील हे अजित पवार यांच्यासोबत बंडात सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे.त्याशिवाय अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विरोधीपक्षनेतेपद सोपवले आहे.
Discussion about this post