मुंबई । अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातून मोठी बातमी असून छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. प्रफुल पटेल यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली असून त्या जागेवर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अजून अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणं छगन भुजबळ यांना फारस पटलेलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी पराभव केला होता. भविष्यातील बारामतीच राजकारण लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवाव असं पक्षात एक मतप्रवाह आहे.
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, पार्थ पवार यांची नाव चर्चेत होती. सुनेत्रा पवार यांच्या नावावर सहमती झाली असून आज त्यांचं नाव जाहीर होईल अशी माहिती आहे. पण छगन भुजबळ या मताशी फारसे अनुकूल नाहीयत. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यावर छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज असल्याची चर्चा आहे.















Discussion about this post