मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फुटनंतर आता अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. अजित पवार यांनी पक्षावर दावा केला आहे. तर शरद पवार यांच्याकडून देखील दावा करण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादीत पक्षात दोन गट पडल्यानतंर अजित दादा आणि शरद पवार यांच्यापैकी कोणाला जास्त आमदारांच समर्थन आहे? या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट झालं आहे.
राष्ट्रवादीच्या 44 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये 42 आमदार हे विधानसभेचे आहेत, तर 2 आमदार विधान परिषदेचे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापत्र दिले आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केवळ 11 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शिवसेनेप्रमाणेच पक्षांतर्गत संघर्ष सुरू होणार का हे पाहावं लागणार आहे
Discussion about this post