नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हपलमेंट कॉर्पोरेशनमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी ठरू शकते. चीफ डायरेक्टर आणि डेप्युटी डायरेक्टर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
या नोकरीबाबत तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे. तुम्ही ncdc.in वर अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्याआधी अर्ज करावेत.
पात्रता काय?
एनसीडीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून एमबी किंवा पीजीडीएम केलेले असावे. तुम्ही मास्टर्स केलेले असावे तरच तुम्हाला नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. चीफ डायरेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी. डेप्युटी डायरेक्टर पदासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असावे.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १२०० रुपये शुल्क भरायचे आहेत. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी कोणतेही शुल्क भरायचे नाही.
पगार
चीफ डायरेक्टर पदासाठी तुम्हाला पे स्केल १३ नुसार, १२३१०० ते २१५९०० रुपये पगार मिळणार आहे. डेप्युटी डायरेक्टर पदासाठी पे स्केल ११ नुसार, ६७७०० रुपये ते २०८७०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.















Discussion about this post