दोन दिवसापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास मंजुर देण्यात आली या फोर्ससाठी ३४६ पद आणि त्यासाठीच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस होते.
राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या स्थापन करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी एकूण आवश्यक ३४६ पदांच्या मनुष्यबळाच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आलीये. यासाठी ३१० पदे नियमित असणार आहेत. तर ३६ पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत.
नियमित पदे कोणती ?
विशेष पोलीस महानिरीक्षक- एक, पोलीस उपमहानिरीक्षक एक, पोलीस अधीक्षक-तीन, अपर पोलीस अधीक्षक-तीन, पोलीस अधीक्षक- १०, पोलीस निरीक्षक १५, सहाय्यक पोलीस निरीक्षक – १५, पोलीस उपनिरीक्षक – २०, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – ३५, पोलीस हवालदार – ४८, पोलीस शिपाई – ८३, चालक पोलीस हवालदार -१८, चालक पोलीस शिपाई -३२, कार्यालय अधीक्षक – एक, प्रमुख लिपीक – दोन , वरिष्ठ श्रेणी लिपीक -११, कनिष्ठ श्रेणी लिपीक – ७, उच्च श्रेणी लघुलेखक – दोन, निम्न श्रेणी, लघुलेखक – तीन.
बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे
वैज्ञानिक सहाय्यक-तीन, विधी अधिकारी – तीन, कार्यालयीन शिपाई -१८, सफाईगार – १२ एकूण – ३६. यासाठी येणारा आवर्ती खर्च हा रुपये १९, २४, १८,३८० रुपये तर वाहन खरेदीसह अनावर्ती खर्चास ३,१२,९८,००० मान्यता देण्यात आली आहे.
Discussion about this post