नागपूर । राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरमध्ये सुरूवात होत आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवाब मलिक हे वर्षभरापासुन अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी नव्हते. तसेच त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही अजित पवार गटात जाणार की शरद पवारांना साथ देणार याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. मात्र त्यांनी आज विधानसभा कामकाजाला हजेरी लावत शरद पवार गटाला धक्का दिला आहे.
मात्र अधिवेशनात त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने चर्चांना उधाण आले आहे. नवाब मलिक यांनी अखेर अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
Discussion about this post