नवी दिल्ली । गेल्या एक वर्षापासून भारतीय कुस्तीपटूंचा एक गट न्यायासाठी याचना करत आहे. परिणामी, रविवारी मोठी बातमी समोर आली आहे. भारत सरकारने भारतीय कुस्ती संघटनेचे निलंबन केले आहे आणि नवे अध्यक्ष बनलेल्या संजय सिंग यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
खरं तर, नुकत्याच भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका पार पडल्या, ज्यामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे जवळचे मित्र संजय सिंह विजयी झाले आणि त्यांना नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. या निवडीनंतर बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावलेल्या कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती
साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी कुस्तीतून निवृत्ती घेतली, तर बजरंग पुनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत केला. या सर्व वादानंतर आता सरकारने मोठी कारवाई करत भारतीय कुस्ती संघटनेला निलंबित केले आहे. कुस्ती स्पर्धा स्थगित करताना क्रीडा मंत्रालयाने संजय सिंगने घेतलेल्या सर्व निर्णयांनाही स्थगिती दिली आहे.
Discussion about this post