१२ वी पास ते पदवीधर उमेदवारांना नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी आहे. या भरतीद्वारे १८८ पदांसाठी भरती करण्यात येणार असून उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
डेप्युटी मॅनेजर विजिलेंस पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवाराकडे एमबीए एचआर किंवा एलएलबी पदवी असणे गरजेचे आहे. याचसोबत १० वर्षांचा अनुभव असायला हवा. असिस्टंट मॅनेज विजिलेंस पदासाठी दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी एचआर पदासाठी दोन वर्षांचा अनुभव असायला हवा.तसेच विविध पदे भरती केली जाणार आहेत. १२ वी पास/ ITI / डिप्लोमा / बी.कॉम / ग्रॅज्युएट / बीई /बीटेक / बीएससी / एमबीए/ पोस्ट ग्रॅज्युएट पदवीधर उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.
ट्रेनी, सिनियर ट्रेनी, मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २७ वर्ष असावी. असिस्टंट मॅनेजर पदासाठी ३० वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी ५० वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिडेटमध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे भरती होणार आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. यानंतर मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २४,६१६ ते १,४१,२६० रुपये पगार मिळणार आहे.
Discussion about this post