Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन (AIAEF) ची राष्ट्रीय सभा जळगाव येथे संपन्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 10, 2025
in जळगाव जिल्हा
0
ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन (AIAEF) ची राष्ट्रीय सभा जळगाव येथे संपन्न
बातमी शेअर करा..!

जळगाव – ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन च्या राष्ट्रीय कार्यकारणीची सभा जळगाव येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ह्या निसर्गाने बहरलेल्या नयनरम्य पर्यावरणीय आनंदाचा सुखद अनुभव देणा-या व जवळपास 650 एकर मध्ये स्थापित विद्यापीठाच्या सुसज्ज स्कूल ऑफ सोशल सायन्सेस् सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
सदर सभेला भारताच्या ओरिसा, तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील AIAEF चे राज्य अध्यक्ष, राज्य महासचिव, राज्य कार्याध्यक्ष उपस्थित होते. तसेच सभेला महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व राज्यातील जिल्हाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषेश:ता चंद्रपूर, वर्धा, अमरावती, मुंबई, गडचिरोली, नाशिक, नागपूर, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील फेडरेशनचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सभेचे अध्यक्ष स्थान केंद्रीय अध्यक्ष प्रा. मधुकर उईके यांनी भूषविले होते. तर या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिनकर पावरा, अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक यांची उपस्थिती होती.
यावेळी मंचावर देविदास उर्फ देवा पवार (केंद्रीय सहकार्याध्यक्ष), ईश्वर धुर्वे (केंद्रीय कोषाध्यक्ष), प्राचार्य डाॅ. चेतनकुमार मसराम (केंद्रीय संघटक), माधवराव गावड (केंद्रीय उपाध्यक्ष तथा नागपूर विभागीय अध्यक्ष ), प्रा. शांताराम उईके (केंद्रीय संघटक), श्रीकांत गांवकर (केंद्रीय संघटक), श्रीकांत मालवी (केंद्रीय सदस्य), कोटे रवी (राज्याध्यक्ष तेलंगणा), टिकेश्वर भोई (राज्य महासचिव ओरिसा), उपासो गावकर (राज्याध्यक्ष गोवा), दिपक करमळकर (राज्य महासचिव गोवा तथा SC/ST आयोग गोवा राज्य अध्यक्ष), चेतन पटेल (राज्य समन्वयक मध्यप्रदेश), यशवंत मलये (राज्याध्यक्ष महाराष्ट्र), गजमल पवार (राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र), विठ्ठलराव मरापे (राज्य महासचिव महाराष्ट्र), किसन तळपाडे (राज्य संघटक महाराष्ट्र), प्राचार्य डाॅ. नाना गायकवाड, (राज्य सदस्य महाराष्ट्र), प्रा.डाॅ. गजानन सोयाम (जिल्हाध्यक्ष वर्धा), सुनिल तलांडे (जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रपूर), मनोहरराव उईके (जिल्हा उपाध्यक्ष अमरावती), संजय पारधी (मुंबई विद्यापीठ) हे उपस्थित होते.

सभेत विविध राज्यांतील राज्य अध्यक्ष व राज्य महासचिव यांनी आप-आपला राज्य अहवाल वाचन करून राज्यातील विविध विषयांची मांडणी केली. अध्यक्षीय मनोगत केंद्रीय अध्यक्ष प्रा. मधुकर उईके यांनी आपल्या मार्गदर्शनात आज पावेतो फेडरेशनव्दारा केलेल्या कार्याचा वृत्तांत उपस्थितांपुढे मांडला शिवाय राज्य पदाधिकाऱ्यांनी आप-आपल्या राज्यात फेडरेशनव्दारे सामाजिक जबाबदारीने कर्मचा-यांच्या प्रश्नांबाबत गंभीर राहून कार्य करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यशवंत मलये यांनी नागपूर येथील केंद्रीय AIAEF फेडरेशन भवन प्रस्तावित इमारत निधी त्वरित जमा करण्याचे आव्हान केले. मंचावरील प्रत्येक वक्त्यांनी नियोजनात्मक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय संघटक प्रा. शांताराम उईके यांनी केले सभेत केंद्रीय सहकार्याध्यक्ष देविदास उर्फ देवा पवार यांनी केंद्रीय कार्यकारणीच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठविण्यात येणा-या 17 ठरावांचे वाचन केले व उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांनी सर्व ठरावाला सर्वानुमते मंजूरी दिली.

महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष गजमल पवार यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हाध्यक्ष मोहन पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष रोहिदास गायकवाड, धुळे तालुका अध्यक्ष आसाराम बागुल, नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा राज्य संघटक सुनिल सुळे, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुवर तसेच जळगाव जिल्ह्यातील वसंत वळवी, प्रकाश वसावे, प्रदिप बारेला, प्रा. के.के. वळवी, प्रा.डाॅ. जयेश पाडवी, डाॅ. रमजान तडवी, विजय चव्हाण, मगन वळवी, प्रा. गौरी वळवी, सौ. सुनिता अहिरे, प्रा.डाॅ. अरुण वळवी, प्रा.डाॅ. राजू आमले, प्रा. संजय पाडवी, प्रा. विनेश पावरा, अब्दुल तडवी (यावल तालुका अध्यक्ष), अर्जुन महाले, खुमानसिंग वळवी, अमित गावित, प्रकाश चौरे, अभिमन्यू पवार, गेंदाराम बारेला, राकेश बारेला यांनी अथक परिश्रमाने कार्यक्रमाचे आयोजन-नियोजन केले. कार्यक्रमात शेवटी उपस्थितांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले. सुत्रसंचलन प्रा.डाॅ. योगेश महाले यांनी केले, प्रा.डाॅ. शाम सोनवणे यांनी आभार प्रदर्शन करुन बैठकीची सांगता केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

20 हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात, गुन्हा दाखल

Next Post

राज्यात गारठा वाढला ; जळगावसह अनेक जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव हुडहुडीने गारठले ! जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद

राज्यात गारठा वाढला ; जळगावसह अनेक जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

१ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक; केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार?

February 26, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची संधी; ९३९६० पर्यंत पगार मिळणार

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page