जळगाव : नशिराबाद येथील १७ वर्षीय मुलीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तंजीला बी. शेख अन्सार (वय १७) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तंजीला आपल्या आई, वडील व लहान बहिणीसोबत नशिराबाद येथील मणियार मोहल्ल्यात राहत होती. वडील शेख अन्सार शेख शकील हे हातमजुरीचा व्यवसाय करतात. तर आई गृहिणी आहे. गुरुवारी दुपारी वडील हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तर आई दुपारी २ वाजेच्या सुमारास लहान बहिणीला घेऊन, गावातच राहत असलेल्या भावाकडे (मुलीच्या मामाकडे) गेली होती. घरात कोणी नसल्याने तंजीलाने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दुपारी ३ वाजता आई घरी आल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याने, खिडकीतून डोकावून पाहताच आईला तंजीलाने गळफास घेतलेला दिसला. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून तंजीलाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. याठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post