नाशिक : नाशिकमध्ये खुनाच्या घटनांचे सत्र सुरूच असून अशातच पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने नाशिक हादरले आहे. यात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. रितेश डोईफोडे असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान जुन्या भांडणाची कुरापत काढून रितेश डोईफोडे याच्यासह त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याचा साथीदार गंभीर जखमी आहे.
नाशिक रोड परिसरातील जेलरोड या ठिकाणी ही घटना घडलीय. रितेश व त्यांचा मित्र सोबत जात असताना रितेशवर एकाने प्राणघातक हल्ला केला. यावेळी रितेशचा मित्र त्याला सोडविण्यासाठी गेला असता त्याला देखील बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान या हल्ल्यात रितेशचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र जखमी झाला आहे. रितेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर रितेशच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी गर्दी रुग्णालयात गर्दी केल्याने पोलिसांचा बंदोबस्त रुग्णालयात तैनात करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे ज्यांनी रितेशची हत्या केली. यानंतर संशयित आरोपी स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आला आहे. याठिकाणी त्याने खून केल्याची माहिती दिली. याबाबत नाशिक रोड पोलीस अधिक तपास करीत आहे. एकंदरीत मागील आठ दिवसांत नाशिकमध्ये तिसरी खुनाची घटना घडली आहे.
Discussion about this post