नाशिक :राज्यातील विविध परिक्षांमध्ये गैरप्रकार आणि पेपर फुटीचे प्रकार काही थांबत नाहीय.राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा कालपासून सुरू झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये वाकी टॉकीच्या मदतीने ऑनलाईन तलाठी परीक्षेचा पेपर फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणात म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन करण्यात जप्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेबइझी इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती.या ठिकाणी हायटेक कॉपीचा प्रकार पोलीसांनी उघड केला.
तरुणाकडूनवॉकी टॉकी, दोन मोबाईल, हेडफोन, सूक्ष्म श्रवणयंत्र आणि एक टॅब असे साहित्य जप्त करण्यात आले. या संशयितांकडून ताब्यात घेतलेल्या मोबाईल आणि टॅबमध्ये सुरु असलेल्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेतील प्रश्नांचे फोटो आढळून आले.
म्हसरूळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून यामागे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली
Discussion about this post