नाशिक । मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा काहींच्या जीवावर उठलाय. नायलॉन मांजामुळे काहींचा गळा चिरला गेला. याच दरम्यान मांजामुळे अवघ्या २३ व्या वर्षी तरूणाचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडलीय. सोनू धोत्रे असे तरूणाचे नाव असून तो संक्रांतीच्या सणासाठी गुजरातहून नाशिकला आला. सोनू धोत्रे याचं पाच महिन्यानंतर लग्न होणार होते, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
सोनू धोत्रे लहान असतानाच आई आणि वडिलांचे निधन झाले होते. त्याला एक मोठा भाऊ आहे, तो नाशिकमध्ये नोकरीला आहे. सोनू धोत्रे गुजरातच्या वलसाडमध्ये महापालिकेच्या गाडीवर चालक म्हणून कामावर आहे. संक्रांतीच्या सुट्टीत भावाकडे गुजरातवरून नशिकमध्ये आला होता. पण काळाने घाला
सोनू धोत्रे याचे लग्न ठरले होते, तो २० मे रोजी विवाह बंधनात अडकणार होता. बुलढाण्यातील चिखली येथील मुलीसोबत आयुष्याची स्वप्न पाहत होता. मात्र नाशिकमधील पाथर्डी फाटा येथून देवळाली कॅम्पकडे जात असताना नायलॉन मांजामुळे मृत्यू झाला. मोटर सायकलवरून सोनू जात होता, त्यावेळी नायलॉन मांजामुळे फास लागला अन् गळा चिरला गेला. त्याला तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.















Discussion about this post