नाशिक । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन प्रचंड अलर्टवर अशातच नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती आहे. दोन्ही गटाकडून मतदान स्लिप वाटपावरून हा राडा झाल्याचं सांगितलं जात असून नाशिकच्या अंबड पोलीस स्थानकाबाहेर गोंधळाचं वातावरण आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे समर्थक मतदार स्लीप वाटत होते. या दरम्यान ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी दोन्ही बाजूने वाद झाला. प्रचंड भांडण सुरु झालं. वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही बाजूने हाणामारी सुरु झाली. या हाणामारीत सुधाकर बडगुजर यांचा कार्यकर्ता जखमी झाला आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते अंबड पोलीस ठाण्याबाहेर आले. यावेळी भाजपचे देखील कार्यकर्ते पदाधिकारी अंबड पोलीस ठाण्याबाहेर आले आहेत.
या राड्यानंतर भाजपचे माजी नगगरसेवक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या गुंडांनी माझ्यावर गोळीबार केल्याचा असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय.भावाने माझ्यावरील गोळी चुकवल्याने मी वाचलो . मात्र भावावर चाकू हल्ला करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय.