सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक अग्नीशमन दलात चालक आणि फायरमन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. एकूण १८६ पदांसाठी भरती ही केली जात असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर होती मात्र आता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तुम्हाला १६ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जर अजूनही कोणी अर्ज केला नसेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहेय
नाशिक अग्निशमन दलातील या नोकरीसाठी इच्छुकांनी https://www.nmc.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीबाबत तुम्हाला पीडीएफ जाहिरातीत माहिती दिली आहे.
नाशिक अग्निशमन दलात चालक, फायरमन अशी एकूण १८६ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. चालक पदासाठी ३६ जागा रिक्त आहेत. फायरमन पदासाठी १५० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
अग्निशमन दलातील चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहेत. याचसोबत राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई येथे ६ महिन्यांचा अग्निशामक कोर्स केलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराकडे जड वाहन परवाना असणे गरजेचे आहे. याचसोबत उमेदवारांना मराठी वाचता लिहता यायला हवे.
फायरमन पदासाठी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत ६ महिन्यांचा प्रशिक्षण कोर्स केलेले असावा. मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.















Discussion about this post