नंदुरबार ! राज्यामध्ये होणाऱ्या महिलांसह अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसून याचदरम्यान, नंदुरबारमध्ये नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे१३ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्या बापाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.धक्कादायक बाब म्हणजे मुलगी गर्भवती राहिली आहे. मुलीची प्रकृती खराब झाल्यानंतर तिला डॉक्टरकडे नेण्यात आले त्यावेळी हा संपूर्ण प्रकार समोर आला.
आईच्या तक्रारीनंतर बापाविरोधात शहादा पोलिस ठाण्यामध्ये बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या घटनेमुळे नंदुरबारमध्ये खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे राहते. या मुलीवर बापानेच लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. पीडित मुलीच्या ४० वर्षीय बापाने एप्रिल २०२४ ते जुलै २०२४ दरम्यान स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी राहत्या घरी ती एकटी असताना शारीरिक संबंध करून तिला गर्भवती केले.
ही घटना कोणाला सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी बापाने आपल्या मुलीली दिली. त्यामुळे घाबरलेली मुलगी गप्प राहिली आणि वडिलांकडून होणारा लैंगिक अत्याचार सहन करत राहिली. पण पोट दुखत असल्याने पीडित मुलीला तिची आई दवाखान्यात घेऊन गेली. पीडित मुलीची तपासणी केली असताना डॉक्टरला देखील धक्का बसला. पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे.
पीडित मुलीला विचारणा केली असता वडिलांनीच आपल्यावर अत्याचार केल्याचे रडत रडत सांगितले. मुलीने सांगितलेला धक्कादायक प्रकार ऐकून तिच्या आईला हादरा बसला. त्यानंतर संतप्त झालेली पीडित मुलीच्या आईने थेट शहादा पोलिस ठाण्यात धाव घेत नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक देखील केली. या घटनेवरून घरामध्येच मुली सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर नंदुरबारमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
Discussion about this post