बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना आता नंदुरबारमधूनही धक्कादायक घटना समोर आली आहे नंदुरबार शहरातील एका शाळेतील पाचवीच्या ११ वर्षीय विद्यार्थिनीला शाळेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रकरणी सफाई कर्मचाऱ्यांला अटक करण्यात आली असून शाळेवर घटना लपवण्याचा होत आहे आरोप होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदूरबारमधील एका नामांकित शाळेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला सफाई कर्मचाऱ्यांने अश्लील व्हिडिओ दाखवले आहेत. सफाई कामगाराने शाळा सुटल्यानंतर एकांतात भेटायला बोलवलं असल्याचीही माहिती आहे. दरम्यान हा सर्व प्रकार शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून सुटला नाही. सीसीटीव्हीत सर्व घटना कैद झाली आहे.
या घटनेनंतर पीडित मुलगी घरी गेली आणि घडलेला सर्व प्रसंग कुटु्ंबीयांना सांगितला. प्रकार ऐकून कुटुंबीयांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. मात्र हा सर्व प्रकार शाळेने लपवल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून शाळेची देखील झाडाझडती घेतली जाणार आहे. दोषी आढळल्यास शाळेवर देखील होणार गुन्हा दाखल करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.















Discussion about this post