नंदुरबार । नंदुरबार मधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. जुन्या वादातून एका मजुराची धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील बिललगावात मधील ही धक्कादायक घटना आहे. जुन्या शेतीच्या वादातून एका मजुराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. फाड्या खाज्या पावरा (वय वर्ष ४०) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी नंदुरबारचा मजुर पंढपुरात गेला होता.
नंतर दुसऱ्या दिवशी तो आपल्या गावी परतला. सकाळी तो नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला. त्या ठिकाणी काही गावकरी आले. पूर्वी झालेल्या शेतीच्या वादाचा राग अजूनही त्या गावकऱ्यांच्या मनात खदखदत होता. रागाच्या भरात गावकऱ्यांनी मजुराला घेरलं.
आरोपींनी आधी मजुराला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर धारदार कुऱ्हाडीनं जोरात हल्ला केला. या हल्ल्यात मजुराचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर ३ आरोपी फरार झाले आणि मृतदेह नदीजवळ पडून होते.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास करत ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मृत्युदेह शवविच्छेदनासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.















Discussion about this post