नंदुरबार । नंदुरबारमध्ये महायुतीला जोरदार धक्का बसलाय. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटलेल्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात माजी खासदार हिना गावित यांनी बंडखोरी केली आहे. भापजने हिना गावित यांना दिलेला उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर आता त्या अपक्ष लढणार आहे. हिना गावित आता अक्कलकुवा अक्राणी विधानसभेतून शिंदे गटाचे उमेदवार आमश्या पाडवी, काँग्रेसचे के सी पाडवी यांना आव्हान देणार आहेत.
माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे एक आणि दुसरा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला महायुतीमध्ये ही जागा सुटलीय. मात्र शिंदे गटातर्फे जाहीर झालेले उमेदवार आमश्या पाडवी विधान परिषदेचे आमदार आहेत, मग पुन्हा त्यांना आमदार होण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित करीत डॉ. हीना गावित यांनी ही जागा भाजपला द्या, आम्ही निवडून आणतो, असा आग्रह धरला होता. त्यानंतर त्यांनी अर्ज भरला.
मात्र आज छाननी दरम्यान हिना गावित यांनी भाजप तर्फे दाखल केलेला अर्ज अवैद्य ठरला असून अपक्ष भरलेला फॉर्म हा वैद ठरलेला आहे. डॉक्टर हिना गावित यांचा अपक्ष उमेदवारीमुळे आता अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात महायुती त मोठा वाद होण्याची शक्यता आहे ..