राज्यात गेल्या काही काळात हिट अँड रनच्या अनेक घटना समोर आल्या असून अशीच एक घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातून समोर आलीय. जिथे रस्त्यावरून पायी जात असलेल्या आई आणि मुलाला एका भरधाव वाहनानं चिरडलं आहे. नंतर चालक फरार झाला आहे. या अपघातात २२ वर्षीय मुलासह ५४ वर्षीय आईचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, कार चालकाविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. हिट अँड रनमुळे आई आणि मुलाचा रस्त्यावर जागीच मृत्यू झाला आहे. फॉर्च्यूनर कारनं आई आणि मुलाला धडक देत चिरडले असून, या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आईचं नाव कमळाबाई तर, मुलाचं नाव आकाश असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं घडलं काय?
वाढदिवस साजरा केल्यानंतर आई कमळाबाई आणि मुलगा आकाश पायी रस्त्यावरून जात होते. नंतर रस्त्यावरून भरधाव वेगाने फॉर्च्यूनर गाडी आली. सुसाट वेगाने येणाऱ्या गाडीने रस्त्यावर चालत असलेल्या आई आणि मुलाला धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.त्यांच्यासोबत एक कुत्रा देखील होता. कुत्रा देखील गाडीच्या चाकाखाली आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
धडक दिल्यानंतर चालक फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, कार चालकविरोधात शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. हिट अँड रनमध्ये आई आणि मुलाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात शोक व्यक्त होत आहे.
Discussion about this post