नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील टपाल कार्यालयाकडून धक्कादायक प्रकार समोर आला होता. पोस्टामार्फत टाकण्यात आलेले कागदपत्रांचे वाटप न करता ते फेकून देण्यात आले होते. या प्रकरणी गैरकारभार करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेल्या मांडवी पोस्ट ऑफिसमधील वावी, कामोद, काकडदा, घाटली, मखतारझिरा, वलवाल, मांडवी बु., मांडवी खु. तसेच जुगणी पोस्ट ऑफिसमधील निगदी, जुगणी, गोरांबा, मोडलगाव, तेलखेडी. वेलखेडी पोस्ट या गावातील सर्व लोकांचे आधार कार्ड, एटीएम कार्ड, बँकेचे चेक बुक, कोर्ट नोटीस, पॅन कार्ड व इतर महत्वाचे कागदपत्रे वडफळ्याकडे बँक ऑफ इंडिया बँकेचा मागे कचऱ्यात फेकण्यात आल्याचे निदर्शनास आले.
पोस्टात आलेल्या महत्त्वाचे कागदपत्रे वाटप न करता फेकल्याचा प्रकार समोर आला होता. कागदपत्रे वाटप केल्याचे भासवत नागरिकांच्या नकली सह्या कर्मचाऱ्यांनी केल्याचे देखील यात समोर आले होते. यामध्ये आधार कार्ड व काही महत्वाची कागदपत्र होती. दरम्यान यानंतर उघड्यावर फेकले ७२४ आधार कार्ड आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे हे घरोघरी जाऊन वाटप करण्याचं काम सुरू आहे. तसेच धडगाव तालुक्यातील चार पोस्ट कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहेत.
Discussion about this post