नंदुरबार । नंदुरबारसह कोल्हापूरमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पदार्फाश झालाय. गुन्हे शाखेने कारवाई करत १ लाख ८० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून दोघं ठिकाणच्या कारवाईत चार जणांना बेड्या ठोकल्या आहे.
कोल्हापुरात करवीर पोलिसांनी हाँगकाँगमधील हाय सिक्युरिटी थ्रेडचा कागद मागवून बनावट नोटा छापणारा आणि चलनात आणणाऱ्या दोघांना अटक केलीय. सिद्धेश घाटगे आणि विकास पानारी अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. यांच्याकडून बनावट नोटा, बनावट नोटा छापलेले प्रिंटर्स पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलेत.
घाटगे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर बनावट नोटा चलनात आणणारा विकास पानारी यालाही पोलिसांनी अटक केली. काही तरुण कळंब्यात बनावट नोटा छापण्याचे काम करतात आणि त्याची माहिती थेट केंद्रीय तपास यंत्रणेपर्यंत पोहोचते आणि स्थानिक पोलिसांना त्याचा काहीच सुगावा लागत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात बनावट नोटांचा सुळसुराट सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत जप्त केले १ लाख ८० रुपयांचे बनावट नकली नोटा जप्त केल्या आहेत. ज्यांना अटक करण्यात आलीय, ते १ लाख रुपयांच्या असली नोटांचा बदल्यात ६ लाखांचे बनावट नोटा देत होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत १ लाख ८० रुपयांच्या बनावट नकली नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी बनावट नोटांचे ३ बंडल पोलिसांनी जप्त केले आहेत. बनावट नोटा देऊन लुटण्याच्या प्रयत्नात आलेल्या दोन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Discussion about this post