मुंबई । भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. आता या अपघाताबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नाना पटोलेंच्या कारला धडक देणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच ट्रक चालकाला देखील अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
गोवर्धन कुसरामला असं ट्रक चालकाचं नाव आहे. अपघातानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर घातपात घडवण्याता प्रयत्न झाला असा आरोपही करण्यात आला होता. अशात आता ट्रक चालकाला अटक केल्यानंतर पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. नाना पटोले प्रचार आटोपून सुकळी गावाच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये नाना पटोले थोडक्यामध्ये बचावले.
नाना पटोलेंची प्रतिक्रिया
‘अपघात की घातपात? पोलीस तपासानंतर सत्य समोर येईल’, अपघातानंतर नाना पटोलेंची अशी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीसांच्या तपासानंतर सत्य काय आहे ते बाहेर येणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अपघातासंदर्भात नाना पटोले यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात हा अपघात झाल्याने अपघाताप्रकरणी काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे. कारला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट याची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.















Discussion about this post