नागपूर । महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ घडली असून नाना पटोले यांना सुरक्षा असताना देखील हा अपघात झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीये. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून नाना थोडक्यात बचावले.
नाना पटोले सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या विजय प्राप्त व्हावा म्हणून नाना दिवसरात्र एक करत दौरे घेत आहेत.काल देखील नाना पटोलेंनी काही ठिकाणी प्रचार दौरे केले. दौरा आटोपून रात्रीच्या ते आपल्या ताफ्यासह स्वगावी निघाले होते. दरम्यान, भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने जबर धडक दिली. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही धडक बसली.
ट्रकची धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये कार पाठीमागच्या बाजूने पूर्णता दाबली गेली आणि तिचा चुराडा झाला. सुदैवाने नानांंना आणि कारमधील अन्य व्यक्तींना यात कोणतीही दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भंडारा पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे.















Discussion about this post